शुक्रवार, १७ मार्च, २०१७

कर्जमाफी२


कर्जमाफी२

एकूणच सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या व शेतीच्या सर्व समस्यांवर उपाय जर कर्जमाफी नसेल तर ते काय असतील याचा उहापोह गरजेचा आहे.
सर्व प्रथम शेतकरी व त्या संबंधीत प्रशासकीय व्यवस्था यांचा परस्पर संबंध तपासला पाहिजे.आजही वास्तवात पीकपध्दती झपाट्याने बदलत असताना सरकारदरबारी त्याची वर्षातुन एकदाच नोंद होते.( वास्तव आहे, तलाठी कार्यालयात याचा आपण अनुभव घेतला असेलच.. कायदा कदाचित वेगळा असेल.) याचा अर्थ आज बाजारु अर्थव्यवस्थेत क्षणोक्षणी बदल होत असताना,वैश्विक हवामान बदल शेतात धुडगूस घालत असताना आहे त्या पीकाची नोंद मात्र अतीढीम्म कार्यपद्धतीने होते. सध्या अस्तित्वात असलेली पीक नोंद पध्दती, पीकमोजमाप पध्दती(आणेवारी) ह्या ब्रिटिशकालीन साच्यातील आहेत. आज तंत्रज्ञानाच्या युगात,जिथे गावानुसार पर्जन्यमान बदलते. तिथे हे बदल टिपायला कोणतीही अत्याधुनिक व्यवस्था आपला समाज,राजकीय व्यवस्था निर्माण करु शकला नाही.
याचा अर्थ अगदि सरळ व स्पष्टपणे कोणत्याही शेतीविषयक उत्पादनाचा,शेतिविशयक आपत्तीचा अचूक अंदाज कोणत्याही सरकारी अथवा खाजगी व्यवस्थेकडे नसतो.
खरी अडचण इथेच आहे.जर आपल्याकडे पीक लागवड,पीकाचे अंदाजे उत्पादन,पीकाचे लागवड क्षेत्र आदींची योग्य माहिती नसल्यामुळे उत्पादन व मागणी यातील सम्नवय बिघडतो. त्यामुळे अचानक शेतीमालाची भाववाढ, भाव कोसळने आदी प्रकार नित्यनेमाने घडत असतात. मध्यमवर्ग हा उत्तम मतपेढी असल्याने भाववाढ झाली की सरकार कृत्रिमपने भाव खाली आणून ठेवते. व शेतिमालाचे भाव पडले कि आपोआप महागाई दर खाली येतो परिणामी दोन्ही वेळी शेतकरीच भरडण्याची प्रक्रिया घडवून आनली जाते.
शेतीमालाचे भाव कृत्रिमरितीने नियंत्रित करणे हे कोणत्याही सरकारसाठी सोयीचे असते.कारण आजमितीला शेतिला खरी गरज आहे ती व्यवस्था ,मूलभूत सुधारणांची.व ते करणे प्रचंड कष्टाचे कार्य आहे. त्यापेक्षा सरकार नेहमीच सोपा पर्याय अवलंबवत असते.
शेतकऱ्यांना ह्या दुष्टचक्रातुन सोडवायचे असेल तर फार मोठ्या मानासिक,सामाजिक, आर्थिक क्रांतीची गरज निर्माण झाली आहे.
कारण सरकार नेहमीच समाज,समाजाची मानसिकता यांचे प्रतिनिधित्व करत असते.
एकूणच शेतकऱ्यांना नुसतीच कर्जमाफी नाही तर क्रांती ची गरज आहे, जी घडवेल मूलभूत बदल..............
पूर्ण.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा